1903+ रिक्त पद भरतीसाठी

महाराष्ट्रातील सर्व इलेक्ट्रिशियन ITI पास विद्यार्थ्यांकरिता महापारेषण (Mahatransco – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित) मध्ये सरकारी नौकरी मिळवण्याची सुवर्णं संधी धावून आलेली आहे. महापारेषण मध्ये इलेक्ट्रिशियन ITI पास विद्यार्थ्यांकरिता विद्युत सहाय्यक (सहायक तंत्रज्ञ) या पदांकरिता 1903+ पदाची भरती जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर पदाकरिता उमेदवार इलेक्ट्रीशियन ट्रेड मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे. सदर पदाची जाहिरात, एकूण पदे, शैक्षणिक अहर्ता, अर्ज करण्याचा प्रकार, अभ्यासक्रम, निवडपद्धती याविषयी सविस्तर माहिती आपल्याला या पेज वरती सर्वात आधी आणि योग्य माहिती देण्यात येईल. करिता सर्व पात्र उमेदवारांनी नियमित या पेज ला भेट देत रहा.

तुमच्या गरजू मित्रांना शेअर करा

WhatsApp
Facebook
Telegram
Email
Twitter

रिक्त पदांचा तपशील

अनु. जाती – 199 | अनु. जमाती – 149 | विमुक्त जाती (अ) – 69 | भटक्या जमाती (ब) – 43 | भटक्या जमाती (क) – 67 | भटक्या जमाती (ड) – 34 | SBC – 41 | OBC – 363 | EWS – 206 | खुला – 732 | दिव्यांग – ४% | अनाथ – १%
एकूण पद संख्या १९०३

शैक्षणिक अर्हता (दिनांक १०.१२.२०२३ पर्यंत)

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.
किंवा
शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
किंवा
सेंटर ऑफ एक्सीलेंस (COE) (Electrical Sector) नवी दिल्ली (NCTVT), यांनी प्रदान केलेले प्रमाणपत्र
बेसिक पाठ्यक्रम (बीबीबीटी) – 1 वर्ष + एडवांस मॉड्यूल – 6 महीने + Apprenticeship Training – 6 months (“Operation & Maintenance of Equipment used in HT, LT, Substation & cable jointing”)

वयोमर्यादा

दि.१०.१२.२०२३ रोजी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे असावे.
शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी म्हणजे (३८+५=४३) शिथीलक्षम राहील.

भरती प्रक्रियेचा कार्यक्रम

अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळाची उपलब्धता : दिनांक २०.११.२०२३ पासून दिनांक १०.१२.२०२३ पर्यंत. ( रात्री ११.५९ मिनीटांपर्यंत)
ऑनलाईन परीक्षेची अंदाजीत तारीख : फेब्रुवारी / मार्च – २०२४

परिक्षा शुल्क

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.५००/-
मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी रु. २५०/-
दिव्यांग व माजी सैनिक साठी रु. ०/-

परीक्षेचे स्वरूप

अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तूनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑनलाईन परिक्षा घेण्यात येईल. सदर परिक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणीक अर्हता (Educational Qualification) व सामान्य अभियोग्यता चाचणी (General Apptitude) यावर आधारित राहील. ऑनलाईन परिक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे राहील:-

अभ्यासक्रम डाउनलोड करा

परिमंडल व विभाग निहाय पदांचा तपशील

अमरावती – ८६ | छत्रपती संभाजीनगर – ३३७ | नाशिक – ३३४ | नागपूर – २१ | कराड – ३५० | पुणे – ४४० | वाशी – ३२५ | ऐरोली – १० | एकूण पद संख्या = १९०३

जाहिरात डाउनलोड करा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता येथे क्लिक करा

परीक्षेची उत्तम तयारी करण्याकरिता

JOIN

इलेक्ट्रीशियन मास्टर कोर्स

Contact on WhatsApp

OFFER Valid Up to

Days
Hours
Minutes
Seconds

Support 7249787277

Contact on WhatsApp